गुन्हे करून कितीवेळ पळत राहाल! हैदराबाद Encounter वर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

2741

डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आला. या डॉक्टरचा मृतदेह नंतर जाळून टाकण्यात आला. इतक्या हिंस्त्रपणे एका तरुणीचे आयुष्य संपवणाऱ्या चारही आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे Encounter केला. डॉक्टर तरुणीच्या हत्येनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. आरोपींना कठोर शासन देण्याची मागणी केली जात होती. शुक्रवारच्या Encounter नंतर टीकेचे लक्ष्य झालेले तेलंगाणा पोलीस आता कौतुकाचे धनी झाले आहे. पीडितेच्या वडिलांसह अनेकांनी तेलंगाणा पोलिसांचे कौतुक केले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने देखील तेलंगाणा पोलिसांचे आभार मानले आहेत. तिने ट्विटरवरून प्रतिक्रिया नोंदवली असून ती म्हणाली आहे की बलात्कारासारखे गुन्हे करून तुम्ही किती वेळ पळू शकाल ? थँक्यू तेलंगाणा पोलीस

अभिनेता नागार्जून यानेही ट्विटरवरून या Encounter बाबत त्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. या बातमीसोबतच माझी सकाळ झाली. अखेर न्याय मिळालाच

डॉक्टर तरुणीच्या मारेकऱ्यांचा पोलिसांनी खात्मा केल्याची बातमी हैदराबादमध्ये वाऱ्यासारखी पसरली. हे वृत्त कळताच बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणींनी आणि मुलींनी एकच जल्लोष केला. ही प्रतिक्रिया अत्यंत उत्स्फुर्त होती, जी मोबाईलमध्ये टीपण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या