मुंबईत येण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने नवजात बालकाला विकले

हैद्राबादमधील एका महिलेने तिच्या नवजात बाळाला 45 हजार रुपयांना विकल्याचे समोर आले आहे. या महिलेचे मुंबईत येण्याचे स्वप्न होते. मात्र त्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून तिने स्वत:च्या पोटच्या बाळाला विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून बाळाला वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

शेख झोया खान (22) असे त्या महिलेचे नाव असून ती गरदोर असताना तिचे व पतीचे भांडण झाल्यानंतर ती वेगळी राहू लागली. लहानपणापासून झोयाला मुंबईचे आकर्षण होते. मुंबईला जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने पोटच्या बाळाला विकण्याचा प्लान बनवला. मात्र तिच्या या प्लान बाबत तिचा नवरा अब्दुल मुजाहीद याला समजले. त्यानंतर त्याने पोलिसांत तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी झोया राहत असलेल्या ठिकाणी धाड टाकली असता तिथे मुलाला विकत घेण्यासाठी आलेले जोडपे, झोया व मध्यस्थी करणारा माणूस उपस्थित होता. पोलिसांनी त्या सर्वांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या