
लोकलमध्ये एखादी वस्तू विसरली की ती परत मिळेलच याची काही शाश्वती नसते. पण रेल्वे पोलिसांनी हा समज चुकीचा ठरवला आहे. रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाची हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेसमध्ये विसरलेली ट्रॉली बॅग शोधून दिली आहे. त्या बॅगेत 23 लाख 56 हजार किमतीचे सोन्याचे दागिने होते. अमृत (नाव बदलले) हे त्यांच्या पत्नीसमवेत हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेसने प्रवास करत होते. कल्याण स्थानकात दोघेही सामानासह उतरले, पण सोन्याचे दागिने असलेली ट्रॉली बॅग विसरले. ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. कल्याण पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून बॅग मिळवून दिली