हैदराबादमध्ये गणेशोत्सवादरम्यान फटाके फोडण्यास बंदी, पोलिसांची सूचना

393

हैदराबादमध्ये गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. तशी सूचनाच पोलिसांनी जाहीर केली आहे.

हैदारबादच्या पोलीस कमिश्नर अंजनी कुमार यांनी ही सूचना जाहीर केली आहे. गणेश चतुर्थीचा पहिला दिवस 2 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास त्यांनी बंदी घातली आहे. या निर्णयामुळे हैदराबादमध्ये नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या