हैदराबादी पुलाव

4

साहित्य :

५०० ग्रॅम बासमती तांदूळ, एक कापलेला कांदा, २५० ग्रॅम भेंडी, ८-१० पाकळी लसूण, १ चमचा आले, केशर, अर्धा चमचा बारीक कापलेली संत्र्याची साले, ५० ग्रॅम मनुके, एक चमचा लिंबाचा रस, तीन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर तेल, सजविण्यासाठी भाजलेले बदाम, बारीक कापलेली कोथिंबीर.

पाककृती :

एका पातेल्यात तेल गरम करावे आणि कांदा टाकून लालसर भाजावा. नंतर तो कांदा एका पेपरवर काढून घ्यावा म्हणजे कांदा कुरकुरीत होईल. मंद आचेवर लसूण आणि आले मिनिटभर भाजावे. त्यात तांदूळ, भेंडी, तिखट टाकावे. त्यानंतर त्यात केशर आणि संत्र्याची साले टाकून उकळावे. उकळी आल्यावर गॅस कमी करावा आणि १५ मिनिट शिजवावे. पाणी आटल्यानंतर मनुके टाकून वरून लिंबाचा रस टाकावा. हवे असल्यास नंतर त्यातून संत्र्याची साले काढून टाकावीत आणि कोथिंबीर व बदामाने सजवून वाढावे.