हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा नाही – आमीर खान

17

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधले कलाकार हे हॉलिवूडमधील चित्रपटात संधी मिळण्याची वाटच बघत असतात. मात्र मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान याला अपवाद ठरलाय. आमीरने त्याला हॉलिवूडमधील चित्रपटात काम करण्याची इच्छाच नसल्याचे सांगितले आहे.

‘मला अमेरिकेत जाऊन तेथील चित्रपटात काम करण्याची इच्छा नाही. बॉलिवूडमध्ये मी खूप खूष आहे. गेल्या २५-२६ वर्षात हिंदुस्थानातील प्रेक्षकांशी माझी नाळ जोळली गेली आहे. त्यामुळे इथल्या लोकांना, इथल्या कलेला प्राधान्य देणे मला अधिक महत्त्वाचे वाटते.’ असे आमीर खानने प्रसारमाध्यमांना सांगितले.

मात्र जर हॉलिवूडमधून एखादा चांगली स्क्रिप्ट आली तर मी नक्कीच तेथे काम करण्याचा विचार करेन, असे देखील त्याने स्पष्ट केले आहे. ‘चांगल्या कामाला सीमांच्या बंधनात मी अडकवणार नाही. मात्र, जर  हॉलिवूडमधून मला जर चांगल्या कामाची ऑफर आली तर मी नक्कीच ती स्विकारेन.’ असेआमीर खानने यावेळी स्पष्ट केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या