मी मास्क घालत नाही, ती काही मोठी गोष्ट नाही; भाजपच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषयी जनतेला संबोधित करताना मास्क घालणे किती गरजेचे आहे ते सांगितले आहे. पंतप्रधान स्वत: देखील लाईव्ह येताना मास्क घालून येतात. मात्र भाजपच्या मंत्रीमडळातील एका मंत्र्याने मोदींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत मनमानी केली आहे. हे मंत्री महोदय अनेक कार्यक्रमांना चक्क मास्क न लावता दिसतात. त्याबाबत त्याला पत्रकारांनी विचारले असता त्यांनी मी मास्क घालत नाही, त्यात काही मोठी गोष्ट नाही असे उलट उत्तर देखील केले.


नरोत्तम मिश्रा असे त्या मंत्र्याचे नाव असून ते मध्य प्रदेशचे गृहमंत्री आहे. मंगळवारी मध्य प्रदेश विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन आयोजित केले होते. त्या अधिवेशनाला नरोत्तम मिश्रा मास्क न घालता आले होते. मास्क लावून येणे बंधनकारक असतानाही मिश्रा यांनी मास्क लावला नव्हता. त्यानंतर त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली तिथे देखीलमास्क नव्हता लावला. त्यामुळे पत्रकारांनी त्यांना त्या वरून हटकले असता त्यांनी ‘मी मास्क घालत नाही, त्यात काही मोठी गोष्ट नाही असे उत्तर देखील दिले. मात्र हे उत्तर दिल्याच्या काही तासातंच नरोत्तम मिश्रा यांनी युटर्न मारला व मी माझी चूक मान्य करतो असे सांगितले.

‘माझे वक्तव्य हे कायद्याचा भंग करणारे होते. मी माझी चूक मान्य करतो व माफीही मागतो. मी यापुढे मास्क घालेन तसेच मी इतरानाही आवाहन करतो की मास्क घाला व सोशल डिस्टन्सिंग पाळा’ असे नरोत्तम मिश्रा यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या