आश्चर्यच! तरुणीला आल्या पुरुषांसारख्या दाढी-मिश्या; शेवींग करायचं सोडून उचललं धाडसी पाऊस

पुरुषांना दाढी-मिश्या येतात हे सर्वांना माहिती आहे, परंतु स्त्रीयांना अशा प्रकारे दाढी-मिश्या आले तर? अर्थात असे घडले तर ती स्त्री समाजात फिरताना लाजते. परंतु सध्या एका अशा तरुणीची चर्चा सुरू आहे जिला पुरुषांसारख्या दाढी-मिश्या आल्या असून तिला त्या पसंतही आहेत.

डकोटा कुक (Dakota Cooke) असे या 30 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती 13 वर्षांची होती तेव्हा तिला दाढी-मिश्या येण्यास सुरुवात केली. तिच्या कुटुंबियांनी अनेक उपचार केले, परंतु दाढी-मिश्या येण्याचे काही बंद झाले नाही. मात्र आता तिने दाढी-मिश्यांसह जगणे शिकले असून या लूकमध्येही आपण खुश असून हॉट दिसत असल्याचे तिने म्हटले आहे.

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये राहणाऱ्या डकोटा कुक हिने सुरुवातीला दाढी-मिश्या काढून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही. तसेच दाढी-मिश्यांपासून सुटका होण्यासाठी ती दिवसातून दोन-तीन वेळा शेवींग करत होती. परंतु आता तिला वाढलेली दाढीच आवडतेय.

वर्षानुवर्ष शेवींग आणि व्हॅक्सिंग करून आपण थकल्याचे डकोटा कुक म्हणाली. आता मला दाढी पसंत असल्याचेही ती म्हणाली. सुरुवातीला अनेक चाचण्या केल्यानंतरही यामागील कारण स्पष्ट झाले नाही. डॉक्टरांनी Testosterone लेव्हल वाढल्याने असे होत असावे अशी शक्यता व्यक्त केली होती. परंतु खरे कारण स्पष्ट झाले नाही.

दाढी-मिश्यांमुळे समाजात वावरताना अनेक अडचणी आल्याचे डकोटा कुकने सांगितले. मला भेदभावाचा सामना करावा लागला. लोक ट्रोक करू लागले. त्यामुळे नोकरीवर जाताना दिवसातून दोनदा शेवींग करत होते. परंतु एका मित्राने सांगितल्यानंतर मी शेवींग करणे बंद केले, असेही तिने सांगितले. सोशल मीडियावरही तिचे चांगले फॉलोअर्स आहेत.

माझ्या मिश्या, माझी शान! मिशीवाली शायजा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली