काँग्रेस प्रवेशाच्या फक्त अफवा, सपना चौधरीचा गौप्यस्फोट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हरयाणाची गायिका व नृत्यांगना सपना चौधरी हिने रविवारी गौप्यस्फोट करत आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.

शनिवारी सपना चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आले होते आणि तिचा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासोबतचा फोटोही व्हायरल झाला होता. सपना चौधरी मथुरामधून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविरोधात मैदानात उतरणार असल्याचेही वृत्त होते. परंतु सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे सांगत या वृत्तातील हवा काढून घेतली.

गायिका व नृत्यांगना सपना चौधरीबाबत या गोष्टी माहिती का?

सपना चौधरी म्हणाली की, ‘मी काँग्रेस पक्षप्रवेश केलेला नाही. माझा आणि प्रियंका गांधींचा व्हायरल होत असलेला फोटो जुना आहे. मला कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यात स्वारस्य नाही. मी एक कलाकार आहे आणि माझ्यासाठी प्रत्येक पक्ष समान आहेत.’ तसेच राज बब्बर यांच्यासोबत माझी कोणत्याही प्रकारची भेट झाली नसून मनोज तिवारींच्या संपर्कात असल्याचेही सपनाने सांगितले.