जिंकण्यासाठीच खेळले! : मेघा धाडे

55

ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलंअसं म्हणावं लागेल बिग बॉसमराठीची  विजेती मेघा धाडेच्या बाबतीतहा शो जिंकण्याचे स्वप्न घेऊनच मी घरात प्रवेश केला. त्याच आत्मविश्वासाने मी खेळले अशी भावना मेघाने व्यक्त केली

 बिग बॉस मराठीचे विजेतेपद पटकावल्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय याबद्दल विचारताच मेघा म्हणाली, ‘‘माझा आनंद मला शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. टीव्हीवर हिंदी बिग बॉस पाहताना आपणही या रिऑलिटी शोमध्ये सहभागी व्हायचे आणि जिंकायचे हे स्वप्न मी पाहिले होते. आता खऱया अर्थाने माझी स्वप्नपूर्ती झाली आहे.’’

   ‘‘शो जिंकणारच या आत्मविश्वासानेच मी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. गेल्या आठवडय़ात फायनलिस्ट म्हणून माझे नाव घेतले तेव्हाच मला माझे स्वप्न पूर्ण होताना दिसत होते,’’ असेही ती पुढे म्हणाली. मेघा बिग बॉसच्या घरात खूप अभ्यास करून आली आहे, अशी टीकाही सदस्यांनी तिच्यावर केली. याबाबत ती म्हणाली, ‘‘माझ्याबद्दल उगाच हे पसरवले गेले. बिग बॉसचे आधीचे एपिसोड मी केवळ प्रेक्षक म्हणून पाहिले. बिग बॉसचा प्रवास किती कठीण असतो हे मला आधीचे एपिसोड पाहून समजले. खरे सांगायचे तर बिग बॉसच्या घरात आपण कसलीही तयारी करून जाऊ शकत नाही. ’’

टास्क माझ्यासाठी महत्त्वाचा

बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच मी टास्कला अधिक महत्त्व दिले. टास्क जिंकण्यावर माझा पहिला फोकस होता. त्यानंतर इतर गोष्टींना मी प्राधान्य दिले. कारण टास्कमुळेच प्रेक्षकांचे मनोरंजन होते. तुमची मानसिक आणि शारीरिक क्षमता लोकांना समजते.

आपली प्रतिक्रिया द्या