मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल!पंकजा मुंडे यांची सूचक प्रतिक्रिया

pankaja-munde

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये स्थान न मिळाल्याबद्दल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सूचक, पण तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील कदाचित. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाढेल तेव्हा देतील.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘रासप’चे प्रमुख महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी राखी बांधल्यानंतर दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या, मंत्रिमंडळ बनवताना सगळय़ांना समाधानी करता येत नसते. पण जे मंत्री झाले आहेत त्यांनी तरी लोकांना समाधानी करावे, असे सांगतानाच आता माझे कार्यकर्ते आणि मीदेखील शांत बसले आहे, असे सांगण्यासही पंकजा विसरल्या नाहीत.

मित्रपक्षांनी लायकी वाढवायला हवी

मित्रपक्षांनी स्वतःची लायकी वाढवायला हवी. त्यांचे आमदार-खासदार वाढले तर आपण मंत्रीपदाची मागणी करू शकता. आता आपले किती आमदार आहेत यादृष्टीने आपण आत्मचिंतन करावे, असे महादेव जानकर यावेळी म्हणाले.