बाळसाहेबांना अटक करण्यास माझा व्यक्तिशः विरोध होता – अजित पवार

ajit-pawar-ncp

दोन हजार साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही चूक होती अशी कबुली राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली होता. शिवसेनाप्रमुखांना त्यावेळी अटक करण्यास आपल्या व्यक्तिशः विरोध होता अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. तसेच सिंचन घोटाळा झालाच नाही असेही पवार यावेळी म्हणाले.

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाला अजित पवार यांनी मुलाखत दिली. तेव्हा अजित पवार म्हणाले की, 2000 साली माझी आमदारकीची पहिली टर्म होती. तेव्हा बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला माझा व्यक्तिशः विरोध होता. ही बाब अन्यायकारक असल्याची माझी भावना होती.  तेव्हा माझे वरिष्ठ म्हणाले की योग्य ती कारवाई केली जाईल. खुनशीपणाचे राजकारण केले जाऊ नये असे आपले म्हणने होते असे अजित पवार म्हणाले.

सिंचन घोटाळ्यावर अजित पवार म्हणाले की, गेली पाच वर्षे सिंचन घोटाळ्याबाबत काहीच तपास झालाच नाही त्याचे कारण सिंचन घोटाळा झालाच नाही. तसेच यंदा आपण एक लाख मताधिक्क्याने निवडून येऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या