स्थानिक स्पर्धांपेक्षा IPL मधील कामगिरीला महत्त्व, BCCI च्या निवड प्रक्रियेवर खेळाडू नाराज

इंडियम प्रीमिअर लीग (आयपीएल 2021) चा 14 वा सीझन जवळ आला आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून टीम इंडियाचे दार ठोठावण्यासाठी खेळाडू सज्ज आहेत. बीसीसीआयची देखील खेळाडूंच्या कामगिरीवर करडी नजर असणार आहे. मात्र टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला माजी खेळाडू नमन ओझा (Naman Ojha) याने बीसीसीआयच्या निवड प्रक्रिया धोरणावर टिका केली आहे. स्थानिक स्पर्धांपेक्षा आयपीएलला जास्त महत्त्व दिला जात असल्याचा आरोप त्याने केला आहे.

खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान देण्यासाठी स्थानिक आणि देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलमधील कामगिरीला जास्त महत्त्व दिले जाते. तसेच आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे संघात स्थान मिळते, असे 37 वर्षीय नमन ओझा म्हणाला.

स्पोर्टसकीडाशी बोलताना नमन ओझा म्हणाला की, हिंदुस्थानी संघासाठी खेळाडूंची निवड होते तेव्हा आयपीएलच्या कामगिरीला जास्त महत्त्व दिले जाते. तुम्ही स्थानिक स्पर्धांमध्ये किती धावा करता याकडे कोणीही लक्ष देत नाही. आयपीएलमध्ये तुम्ही एक-दोन चांगल्या खेळ्या केल्या की त्याची कसोटी, एक दिवसीय आणि टी-20 मध्ये साठी निवड होते. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे टी-20 साठी निवड होऊ शकते, मात्र एक दिवसीय आणि कसोटीसाठी तुम्ही या कामगिरीच्या आधारे निवड करू शकत नाहीत. आणि हो तसे असेल तर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडू का खेळतीय? त्यावर एवढा पैसा का खर्च केला जातोय? असा सवाही त्याने उपस्थित केला.

नमन ओझा याने याच वर्षी 15 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. हिंदुस्थानसाठी त्याने 1 कसोटी, 1 एक दिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळले आणि यात त्याने 79 धावा केल्या. तसेच मध्य प्रदेशकडून त्याने प्रथम श्रेणीचे 146 सामने खेळले. यात त्याने 41.67 च्या सरासरीने 9753 धावा केल्या आहेत. तसेच विकेटमागे त्याने 471 शिकार केल्या आहेत.

तसेच 2013 ते 2015 मध्ये खेळल्या गेलेल्या 7 रणजी ट्रॉफी सामन्यात 835 धावा केल्या होत्या. तसेच इंडिया अ संघाकडून खेळताना त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन शतकंही ठोकली होती.

आपली प्रतिक्रिया द्या