काँगेससहित कोणत्याही पक्षात जाणार – जिग्नेश मेवानी

18

सामना ऑनलाईन ।अहमदाबाद

ओबीसींचे नेते अल्पेश ठाकोर यांनी काँगेसमध्ये प्रवेश केला असला तरी गुजरातमधील लढाऊ दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी आपण काँगेससहित कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे आज स्पष्ट केले. गुजरातमध्ये दलितांची लोकसंख्या ७ टक्के असून मध्यंतरी झालेल्या अत्याचारांमुळे त्यांच्यात भाजप सरकारविषयी प्रचंड चीड आहे. मेवानी यांनीही राहुल गांधी यांची अद्यापि भेट घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनीही हार्दिक पटेल यांच्याप्रमाणेच काँगेसला दलितांबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले असावे, असे मानले जाते. मी, अल्पेश ठाकूर आणि हार्दिक पटेल भाजपच्या विरोधात आहोत. आम्ही तिघे एकत्र आलो की, भाजपचा पराभव निश्चित आहे, असे मेवानी यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या