
हिंदुस्थानी हवाई दलाला पहिले राफेल मिळाले आहे. फ्रान्सच्या दसॉ एव्हिएशनने गुरुवारी हवाई दलाकडे पहिले राफेल सुपूर्द केले आहे. यावेळी डेप्युटी चिफ एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी सुमारे तासभर राफेलमधून उड्डाण केले.
Indian Air Force (IAF) Sources: IAF received its first ‘acceptance’ Rafale combat aircraft from Dassault Aviation in France, yesterday. Deputy Air Force Chief Air Marshal VR Chaudhary also flew in the aircraft for around one hour. (file pic) pic.twitter.com/bzm0gwuVWd
— ANI (@ANI) September 20, 2019
हिंदुस्थानी हवाई दलाच्या एका पथकाला फ्रान्सच्या हवाई दलाने राफेलसाठी प्रशिक्षण दिले आहे. हवाई दलाकडून मे 2020 पर्यंत तीन पथकांमध्ये 24 पायलटना राफेल उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सप्टेंबर 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदीसाठी फ्रान्स सरकार आणि द सॉल्ट एव्हिएशनसोबत करार करण्यात आला होता. युपीए सरकारच्या काळात तंत्रज्ञान देण्यावरून झालेल्या मतभेदांमुळे हा करार होऊ शकला नव्हता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यावर करारासाठी प्रयत्न करण्यात आले आणि मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यावेळी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.