आपलेच हेलिकॉप्टर पाडणार्‍या हवाई दलाच्या अधिकार्‍यांचे होणार कोर्टमार्शल

our helicopter targeted by our officer

पीओकेच्या बालाकोटवरील एअर स्ट्राईकनंतर दुसर्‍याच दिवशी 27 फेब्रुवारीला हिंदुस्थानी हवाई दलाने चुकून हिंदुस्थानचेच एमआय-17 हेलिकॉप्टर क्षेपणास्त्राने पाडले होते. या चुकीची गंभीर दखल घेत हवाई दलाने आपल्या 6 अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले. त्यातील 2 अधिकार्‍यांना कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागणार आहे.

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसर्‍या दिवशी हिंदुस्थानी लष्करी तळांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला होता. यावेळी श्रीनगरमधील एअर डिफेन्स प्रणालीने हिंदुस्थानी लष्कराच्याच एमआय-17 हेलिकॉप्टरला चुकून लक्ष्य केले होते. या चुकीच्या कारवाईत हेलिकॉप्टरमधील हिंदुस्थानचे सर्व 6 अधिकारी मारले गेले होते. सुरुवातीला हा विमान अपघात मानला जात होता. पण चौकशीअंती ती आपल्याच हवाई दल अधिकार्‍यांचीच चूक असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर 2 फ्लाइट लेफ्टनंट दर्जाच्या तर 2 एअर कमोडोर दर्जाच्या अधिकार्‍यांना प्रशासनिक शिक्षा आणि 1 ग्रुप कॅप्टन आणि 1 विंग कमांडर दर्जाच्या अधिकार्‍याला कोर्ट मार्शलची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या