पुण्याच्या इब्राहिमची चमक, इंडियन रेसिंग चॅम्पियनशिप

401

पुण्याच्या मुहम्मद इब्राहिमने वोक्सवॅगन मोटरस्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई फालकन्स इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱया फेरीत चमक दाखवली. त्याने चेन्नईच्या अमित कुट्टीला मागे टाकत प्रो श्रेणीतील आपल्या सर्व रेस जिंकल्या.

इब्राहिम याने जागतिक रोटॅक्स कारटिंग फायनल्समध्ये सहभाग नोंदवला तसेच आशियाई रोटॅक्स चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपद मिळवले. इब्राहिमने रेसमध्ये सुरुवातीपासूनच चमक दाखवली. त्याने उटीच्या निरंजन कुमारला मागे टाकत 1:47.778 वेळेसह पोल पोझिशन मिळवली. दुसऱया हंगामातील चॅम्पियन साई पृथ्वी तिसऱया तर, कुट्टीला चौथ्या स्थानी पोहोचता आले.

इब्राहिमने आपल्या रेसची चांगली सुरुवात करत आघाडी घेतली. कुट्टीने चौथ्या स्थानावरून दुसऱया स्थानी झेप घेतली. इब्राहिमने कुट्टी आणि पृथ्वीला मागे टाकत विजय मिळवला. राघव बुधीराजा (दिल्ली) आणि अब्दुल हादी (त्रिसूर) यांनी अव्वल पाच जणांमध्ये स्थान मिळवले. मुंबई फालकन्स इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये कार्ट रेसर मुहम्मद इब्राहिम यांनी सहभाग नोंदवल्याने सर्वांचे लक्ष वेधले.

आपली प्रतिक्रिया द्या