बीसीसीआय पडली एकटी,‘बिग थ्री’ शेअरिंगविरोधात बहुतांश सदस्यांचे मतदान

52
दत्ता गायकवाड (१९५९) – ४ सामने

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महसूल वाटपातील ‘बिग थ्री’ फॉर्म्युला रद्द करून समानता आणण्याच्या ठरावाला शनिवारी बलाढय़ बीसीसीआयच्या विरोधाला न जुमानता आयसीसी बैठकीत बहुमताने मंजुरी दिली. मात्र बीसीसीआयचे नवे प्रशासक विक्रम लिमये यांनी या ठरावाला विरोध केल्याने त्याची अंमलबजावणी करण्याबाबतचा अंतिम निर्णय एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या आयसीसी बैठकीत घेण्याच्या सूचनेला चेअरमन ऍड. शशांक मनोहर यांनी मान्यता दिली.

आयसीसीच्या दुबईतील आजच्या बैठकीत हिंदुस्थान व श्रीलंका वगळता सर्वच सदस्य देशांनी ‘बिग थ्री’ महसूल वाटपाच्या धोरणाविरोधात मतदान केले. पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड या देशांनी ‘बिग थ्री’ महसूल वाटप फॉर्म्युलाच्या विरोधात मत टाकल्याने बीसीसीआय एकटी पडली आहे. जुन्या फॉर्म्युल्यामुळे क्रिकेट महसुलातला मोठा वाटा हिंदुस्थान, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या तीन बडय़ा सदस्यांना व्हायचा. हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारे लिमये यांच्या सूचनेनंतर नव्या ठरावाच्या अंमलबजावणीचा निर्णय एप्रिल २०१७च्या बैठकीत घेण्याची घोषणा आयसीसीने केली.

आपली प्रतिक्रिया द्या