ICC Awards 2023 – हिंदुस्थानचा दबदबा, पाकिस्तानला ठेंगा; पहा संपूर्ण यादी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2023 साठीच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू, तर इंग्लंडच्या नेट सायवर ब्रंट हिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहलीसह सूर्यकुमार यादव यांनीही आयसीसीच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे.

विराट कोहली याला सर्वोत्कृष्ट पुरुष वन डे खेळाडू, तर सूर्यकुमार यादव याला सर्वोत्कृष्ट पुरुष टी-20 खेळाडूचा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे आयसीसीने 2023 साठी निवडलेल्या सर्वोत्तम टी-20 संघाचे कर्णधारपदही सूर्याकडे सोपवले आहे. तर वन डे संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

आयसीसीच्या पुरस्कारांवर हिंदुस्थानचाच दबदबा दिसून आला, मात्र पाकिस्तानचे हात मोकळे राहिले. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूने (पुरुष किंवा महिला) आयसीसीचा पुरस्कार जिंकला नाही. तसेच आयसीसीने निवडलेल्या कसोटी, वन डे आणि टी-20 संघात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही. खास बाब म्हणजे युगांडा आणि झिम्बाब्वेच्या खेळाडूंना यात स्थान मिळाले आहे.

आयसीसी पुरस्कारांची संपूर्ण यादी –

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू (राचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी) – नेट सायवर ब्रंट, इंग्लंड
सर्वोत्कृष्ट महिला टी-20 खेळाडू – हेली मॅथ्यूज, वेस्ट इंडिज
सर्वोत्कृष्ट महिला वन डे खेळाडू – चमारी अटापट्टू, श्रीलंका
उदयोन्मुख महिला खेळाडू – फोफो लिचफिल्ड, ऑस्ट्रेलिया
असोसिएट देशातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू – क्विनटोर एबेल, केनिया

सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू (सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी)) – पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलिया
सर्वोत्कृष्ट पुरुष वन डे खेळाडू – विराट कोहली, हिंदुस्थान
सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी खेळाडू – उस्मान ख्वाजा, ऑस्ट्रेलिया
सर्वोत्कृष्ट पुरुष टी-20 खेळाडू – सूर्यकुमार यादव, हिंदुस्थान
उदयोन्मुख पुरुष खेळाडू – रचिन रवींद्र, न्यूझीलंड
असोसिएट देशातील सर्वोत्कष्ट खेळाडू – बास डी लीडे, नेदरलँड

सर्वोत्कृष्ट पंच – रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लंड
आयसीसी स्पिरीटऑफ द क्रिकेट अवॉर्ड – झिम्बाब्वे

टी-20 संघ (पुरुष) – सूर्यकुमार यादव (कर्णधार), फिल सॉल्ट, यशस्वी जैस्वाल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), मार्क चॅम्पमॅन, सिकंदर रजा, अल्पेश रमजानी, मार्क अडायर, रवि बिश्नोई, रिचर्ड एनगरवा

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

कसोटी संघ (पुरुष) – पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, केन विलियमसन, जो रूट, ट्रॅविस हेड, रवींद्र जडेजा, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), आर. अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड

वन डे संघ (पुरुष) – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रॅविस हेड, विराट कोहली, डेरिल मिचेल, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), मार्को यानसेन, एडम जाम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

वन डे संघ (महिला) – चमारी अटापट्टू (कर्णधार), फीबी लिचफील्ड, एलिस पेरी, अमेलिया कर, बेथ मूनी (यष्टीरक्षक), नेट शिवर-ब्रंट, एश्ले गार्डनर, एनाबेल सदरलैंड, नादिन डी क्लार्क, ली ताहुहू, नाहिदा अख्तर

टी-20 संघ (महिला) – चमारी अटापट्टू (कर्णधार), बेथ मूनी (यष्टीरक्षक), एल वोलवार्ड्ट, हेली मैथ्यूज, नेट शिवर-ब्रंट, अमेलिया कर, एलिस पेरी, एश्ले गार्डनर, दीप्ति शर्मा, सोफी एक्लेस्टोन, मेगन शुट्ट