टी -20 वर्ल्ड कप होणार की नाही? आज आयसीसीच्या बैठकीत होणार निर्णय

620

या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपवर कोरोना विषाणूचे संकट ओढावलेलं आहे. यामुळे अनेकांच्या मनात यावर्षी टी -20 वर्ल्ड कप होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान याबाबत निणर्य घेण्यासाठी सोवमारी सर्व क्रिकेट बोर्डाची आयसीसी सोबत बैठक होणार आहे. या बैठकीत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी आयसीसी स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत चर्चा होईल. टी -20 वर्ल्ड कप पुढे ढकलल्यास इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित करण्याचा मार्ग खुला होईल.

टी -20 वर्ल्डकपच्या सुधारित तारखांची घोषणा केली जाणार नाही. म्हणजे टी -20 वर्ल्ड कपवर आयसीसी अंतिम निर्णय घेईल. टी -20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात होणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र कोरोना संकटामुळे याबाबत फेरविचार सुरु आहे. आयसीसी बोर्डाची शेवटची बैठक 24 जून रोजी झाली होती. ज्यामध्ये टी -20 वर्ल्ड कप संदर्भातील निर्णय पुढे ढकलण्यात आला. असे बोलले जात आहे की, कोरोना संकटामुळे टी -20 वर्ल्ड कप पुढे ढकलल्यास आयपीएल आयोजित करण्याचा मार्ग खुला होईल. म्हणजेच बीसीसीआय ऑक्टोबर-नोव्हेंबरची तारीख आयपीएलसाठी वापरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या