ICC ODI Ranking – कोहली, रोहित, बुमराहचा दबदबा कायम; आयर्लंडच्या खेळाडूंची पहिल्यांदाच रेसमध्ये एन्ट्री

4821
virat-bumrah-rohit-sharma

कोरोना संकटकाळात टीम इंडियाने एकही सामना खेळला नसला तरी एकदिवसीय क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह यांचा दबदबा कायम आहे. विराट कोहली फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या, तर रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. या क्रमवारीत आयर्लंडचा कर्णधार एंड्रयू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांनी मोठी उडी घेतली आहे.

विराट कोहलीकडे 871 पॉईंट असून रोहितकडे 855 पॉईंट आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम यांच्या नावावर 829 पॉईंट आहेत. आयर्लंडचा कर्णधार एंड्रयू बालबर्नी याने नुकतीच इंग्लंडविरुद्ध झालेल्या वन डे मध्ये 113 धावांची खेळी केल्याने क्रमवारीत 42 व्या स्थानावर उडी घेतली आहे, तर पॉल स्टर्लिंग याने 142 धावांची खेळी करत 26 व्या स्थानावर उडी घेतली आहे.

गोलंदाजीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट पहिल्या तर बुमराह 719 पॉईंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयर्लंडचा गोलंदाज क्रेग यंग इंग्लंडविरुद्ध मालिकेत 6 बळी घेत 40 व्या स्थानावर उडी घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या