‘आयसीसी’कडून नव्या पुरस्काराची घोषणा, हिंदुस्थानचे पाच खेळाडू शर्यतीत

कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेली क्रिकेटची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या वर्षापासून नव्या पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘प्लेयर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू असे या नव्या पुरस्काराचे नाव असून जानेवारी महिन्यापासूनच या पुरस्काराची सुरुवात होणार असल्याचे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले आहे.

जानेवारीतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी हिंदुस्थानच्या सर्वाधिक 5 क्रिकेटपटूंना नामांकन मिळाले आहे. यामध्ये मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन यांच्यासह वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन व रिषभ पंत या युवा खेळाडूंचाही समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या