अश्विन, रूट, काईलमध्ये रेस; आयसीसीच्या मासिक पुरस्कारासाठी दावेदार

आयसीसीच्या ‘प्लेयर ऑफ दी मंथ’ अर्थातच महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावण्यासाठी तीन खेळाडूंमध्ये चुरस लागणार आहे. हिंदुस्थानचा रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा जो रूट व वेस्ट इंडीजचा काईल मायर्स या तीन क्रिकेटपटूंची नावे फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी आयसीसीकडून मंगळवारी जाहीर करण्यात आली.

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही ठसा उमटवला आहे. त्याने 176 धावा फटकावल्या असून 24 फलंदाजही बाद केले आहेत. त्यामुळे हा पुरस्कार पटकावण्यासाठी अश्विन हा प्रमुख दावेदार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या