कोण ठरणार दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू? आयसीसीकडून नामांकन यादीची घोषणा

मागील दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. आयसीसीकडून मंगळवारी विविध गटांतील नामांकित क्रिकेटपटूंच्या यादीची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहली याचा पाचही यादीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा व रविचंद्रन अश्विन या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे. महिलांच्या यादीत मिताली राज, झुलन गोस्वामी या हिंदुस्थानच्या अनुभवी खेळाडूंना पुरस्कार जिंकण्याची संधी असणार आहे. सर्वाधिक मते मिळालेल्या क्रिकेटपटूला पुरस्कार देण्यात येणार आहे. आयसीसीच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती उपलब्ध आहे.

नामांकित खेळाडूंची यादी

  • दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू

विराट कोहली (हिंदुस्थान), रविचंद्रन अश्विन (हिंदुस्थान), जो रूट (इंग्लंड), केन विल्यमसन
(न्यूझीलंड), स्टीवन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), ए बी डिव्हिलीयर्स (दक्षिण आफ्रिका), कुमार संगक्कारा (श्रीलंका).

  • दशकातील वन डेतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया), मिताली राज (हिंदुस्थान), सुझी बेटस् (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज), झुलन गोस्वामी (हिंदुस्थान).

  •  दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), सुझी बेटस (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज), मिताली राज (हिंदुस्थान), साराह टेलर (इंग्लंड).

  • दशकातील वन डेतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू

विराट कोहली (हिंदुस्थान), लसिथ मलिंगा (श्रीलंका), मिचेल स्टार्प (ऑस्ट्रेलिया), ए बी डिव्हिलीयर्स (दक्षिण आफ्रिका), रोहित शर्मा (हिंदुस्थान), महेंद्रसिंग धोनी (हिंदुस्थानी), कुमार संगक्कारा (श्रीलंका).

  • दशकातील कसोटीमधील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू

विराट कोहली (हिंदुस्थान), केन विल्यमसन (न्यूझीलंड), स्टीवन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), जेम्स अॅण्डरसन (इंग्लंड), रंगाना हेराथ (श्रीलंका), यासीर शहा (पाकिस्तान).

  • दशकातील टी-20 तील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू

राशीद खान (अफगाणिस्तान), विराट कोहली (हिंदुस्थान), इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका), अॅरोन फिंच (ऑस्ट्रेलिया), लसिथ मलिंगा (श्रीलंका), ख्रिस गेल (वेस्ट इंडीज), रोहित शर्मा (हिंदुस्थान).

  • दशकातील स्पिरिट ऑफ दी क्रिकेट पुरस्कार

विराट कोहली (हिंदुस्थान), केन विल्यमसन (न्यूझीलंड), ब्रॅण्डन मॅक्कलम (न्यूझीलंड), मिसबाह उल हक (पाकिस्तान), महेंद्रसिंग धोनी (हिंदुस्थान), अॅनया श्रुबसोल (इंग्लंड), पॅथरीन ब्रुंट (इंग्लंड), महेला जयवर्धने (श्रीलंका), डॅनियल व्हेट्टोरी (न्यूझीलंड).

टीम इंडियाचा कर्णधार ठरणार सरस

विराट कोहलीची दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, वन डेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू, कसोटीतील सर्वोत्तम क्रिकेटपटू, टी-20तील सर्वोत्तम क्रिकेटपटू व स्पिरिट ऑफ दी क्रिकेट म्हणजेच खेलभावना या पाचही पुरस्कार यादीत निवड करण्यात आली आहे. सवोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार शर्यतीत त्याच्यासमोर हिंदुस्थानच्याच रविचंद्रन अश्विनचे आव्हान असणार आहे. तसेच टी-20तील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी त्याला रोहित शर्माला झुंज द्यावी लागणार आहे. सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी विराट कोहलीसह महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा या दोन हिंदुस्थानी खेळाडूंना यादीत स्थान देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या