कोहली, बुमराह अव्वल स्थानी कायम, ‘आयसीसी’एकदिवसीय क्रमवारी जाहीर

400

‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रिकेटच्या ताज्या क्रमवारीत अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीतील अव्वल स्थान कायम राखले. रोहित शर्माही फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरने गोलंदाजी क्रमवारीत सहा स्थानाने प्रगती करताना सातव्या स्थानी झेप घेतली. पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फखर जमान यालाही दोन स्थानाचा फायदा झाला असून तो 16 व्या क्रमांकावर आलाय. हारिस सोहेललाही तीन स्थानचा फायदा झाला असून तो 32 व्या क्रमांकावर आलाय. याचबरोबर इंग्लंडचा संघ 125 गुणांसह एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी असून ‘टीम इंडिया’ 122 गुणांसह दुसऱया स्थानी आहे. त्यानंतर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका अनुक्रमे तीन ते आठ स्थानावर आहे. नामिबिया, ओमान व अमेरिका हे संघही एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळाल्याने पात्रता सामने खेळून क्रमवारीत आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या