WTC Final कोणताही फॉर्म्यूला वापरा, पण विजेता एकच हवा! लिजेंड खेळाडूचे आयसीसीला साकडे

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात इंग्लंडच्या साउथहॅम्प्टन येथे सुरू असलेल्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा पावसामुळे विचका झाला आहे. पावसामुळे पहिला आणि चौथा दिवस एकही चेंडू न टाकता वाया गेला, तर उर्वरित दोन दिवसात फक्त 141.1 षटकांचा खेळ होऊ शकला. त्यामुळे आयसीसीच्या नियोजनावर दिग्गज खेळाडू चांगलेच बरसत आहेत.

अशातच टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता एकच हवा आणि यासाठी आयसीसीने काहीतरी फॉर्म्यूला वापरावा, असे साकडे घातले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवात साधताना त्यांनी याबाबत विधान केले.

मला असे वाटते की जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अनिर्णित राहील आणि चषक दोन्ही संघांमध्ये विभागून दिला जाईल. आयसीसीच्या स्पर्धेचा चषक अशाप्रकारे दोन संघात विभागून देण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल, असे सुनिल गावस्कर म्हणाले. तसेच उर्वरित दोन दिवसात तीन डाव होणे जवळपास अशक्य वाटत आहे. मात्र दोन्ही संघांच्या फलंदाजांनी खराब खेळ केल्यास तिन्ही डाव पूर्ण होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अनिर्णित राहिला हा तर विजेत्या संघाची निवड करण्यासाठी आयसीसीने काहीतरी फॉर्म्यूला वापरावा. आयसीसीच्या क्रिकेट कमिटीने याबाबत विचार करावा आणि काही ना काही निर्णय घ्यावा, असे सुनिल गावस्कर म्हणाले.

ICC वर सेहवाग वैतागला, लोकांनीही मीमद्वारे केली धुलाई

चार दिवसात फक्त 141 षटकांचा खेळ

दरम्यान, साउथहॅम्प्टन येथे सुरू असलेल्या अंतिम लढतीत पावसाचे विघ्न आले आहे. पहिल्या चार दिवसात फक्त 141.1 षटकांचा खेळ झाला आहे. यात टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावात संपुष्टात आला, तर न्यूझीलंडचा संघ 2 बाद 102 धावा अशा स्थितीत आहे. या लढतीसाठी आयसीसीने एक दिवस अतिरिक्त ठेवला आहे. परंतु दोन दिवसात 308.5 षटकांचा खेळ होणे अशक्य वाटत आहे.

WTC final – पाऊस थांबला नाही तर… जाणून घ्या काय होऊ शकतो सामन्याचा निकाल

आपली प्रतिक्रिया द्या