आयसीसी कसोटी क्रमवारीत पंतचा जलवा, कोहली पहिल्यांदाच टॉप-3 मधून बाहेर

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघातील मालिका संपल्यानंतर आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ब्रिस्बेनमधील निर्णायक कसोटीत नाबात अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून देणाऱ्या ऋषभ पंतने क्रमवारीत हनुमान उडी घेतली आहे. पंतला 13 स्थानांचा फायदा झाला असून आता तो 13 व्या क्रमांवर विराजमान झाला आहे.

आयसीसीने बुधवारी जारी केलेल्या कसोटी संघाच्या क्रमवारीत टीम इंडिया 118 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विलियम्सन पहिल्या आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. ताज्या क्रमवारीत विराटला नुकसान झाले असून तो तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. ब्रिस्बेनमध्ये शतकी खेळी करणारा मार्नस लाबुशेन आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या दहांमध्ये चेतेश्वर पुजारा सातव्या आणि अजिंक्य रहाणे नवव्या स्थानावर आहे.

गोलंदाजांमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक बळी घेणारा पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर असून इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड आणि न्यूझीलंडचा निल वॅगनार अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप 10 गोलंदाजांमध्ये हिंदुस्थानचा रवींद्र जाडेजा आठव्या आणि जसप्रीत बुमराह नवव्या स्थानावर आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारी –

1. न्यूजीलंड – 118
2. हिंदुस्थान – 118
3. ऑस्ट्रेलिया – 113
4. इंग्लंड – 106
5. दक्षिण आफ्रिका – 96
6. श्रीलंका – 86
7. पाकिस्तान – 85
8. वेस्टइंडीज – 79
9. बांग्लादेश – 55
10. ज़िम्बाब्वे – 18

आपली प्रतिक्रिया द्या