विश्वचषकात टीम इंडियाच्या ‘या’ खेळांडूंची ५ स्टार कामगिरी

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अंडर-१९ विश्वचषकावर हिंदुस्थानने मोहोर उमटवली आहे. फायनलमध्ये हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला ८ विकेटने धूळ चारत चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या २१६ धावांचे आव्हान हिंदुस्थानने ३८.५ षटकात २ विकेटच्या बळावर पूर्ण केले. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरलेल्या अंडर-१९ संघामधील पाच खेळाडूंनी विशेष प्रभावित केले आहे.

१) पृथ्वी शॉ –

showaप्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अंडर-१९ विश्वचषकात कर्णधारपदाचे ओझे घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉ ने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. विश्वचषकाच्या ६ सामन्यातील ५ डावात फलंदाजी करताना पृथ्वीने २ अर्धशतकासह २६१ धावा केल्या.

२) मनजोत कालरा –

kalraअंडर-१९ विश्वचषकाच्या फायनमध्ये खणखणीत शतक झळकावत विक्रम नोंदवणाऱ्या सलामीवीर मनजोत कालराने संपूर्ण विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. फायनलमध्ये कालराने १०२ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ३ षटकारांसह शतकी खेळी सजवली आणि हिंदुस्थानला विजय मिळवून दिला. या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनाविराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

३) शुभम गिल –

gillअंडर-१९ विश्वचषकातील धडाकेबाज फलंदाज आणि हिंदुस्थानचा ब्रॅडमन अशी उपमा मिळालेल्या शुभम गिलने स्पर्धेत आपली छाप पाडली. शुभमने विश्वचषकाच्या एकूण ६ सामन्यातील ५ डावात फलंदाजी करताना १ शतक आणि ३ अर्धशतकांसह ३७२ धावांची लयलूट केली. उपांत्याफेरीत पाकिस्तानविरुद्ध गिलने शतक ठोकत हिंदुस्थानचा फायनलमधील प्रवेश निश्चित केला होता.

४) कमलेश नागरकोटी –

nagarkotiहिंदुस्थानी संघाचा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीने संपूर्ण विश्वचषकात आपल्या वेगाने क्रिकेट वर्तुळाला प्रभावित केले. फायनलमध्ये नागरकोटीने २ बळी घेतले तर संपूर्ण स्पर्धेत ९ बळी मिळवले.

५) अनुकूल रॉय –

anukulहिंदुस्थानच्या अंडर-१९ संघातील फिरकीपटू अनुकूल रॉयने विश्वचषकामध्ये आपल्या फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवले. स्पर्धेत ६ सामन्यात गोलंदाजी करताना रॉयने एकूण १४ फलंदाज बाद करत स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला.

आपली प्रतिक्रिया द्या