बांगलादेशी खेळाडूंना ‘धक्का’ भोवणार, ICC ‘बुक्की’ देण्याच्या तयारीत

2491
ind-v-ban

खेळात जय-पराजय हे होतच असतात, ते दोन्ही पचवू शकतात ते खरे खेळाडू. मात्र 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर बांगलादेशी क्रिकेटपटूंकडून असभ्य वर्तन करण्यात आलं. त्यामुळे बांगलादेशी खेळाडूंवर हिंदुस्थानातूनच नाही तर जगभरातून टीका होत आहे. त्यानंतर आतंरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच आयीसीसीने देखील गांभीर्य लक्षात घेतत कारवाईची तयारी दाखवली आहे.

हिंदुस्थानच्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप संघाचे व्यवस्थापक अनिल पटेल यांनी सांगितले की, अंतिम सामना जिंकल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानावर जो प्रकार केला त्याकडे आयसीसी गांभीर्याने लक्ष देत आहे. शेवटच्या काही मिनिटांचे व्हिडीओ आयसीसी तपासत आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

टीम इंडिया आणि बांगलादेश संघामध्ये रविवारी अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला. चुरशीच्या झालेल्या या लढतीत बांगलादेशने चार वेळच्या विजेत्या टीम इंडियाचा पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषक उंचावला. मात्र विश्वचषक जिंकल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी संतुलन गमावले आणि टीम इंडियाच्या खेळाडूंशी गैरवर्तन केले.

दोन्ही संघाचे खेळाडू भर मैदानातच भिडले. बांगलादेशच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या खेळाडूंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. यामुळे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंवर मोठी टीका सुरू झाली. बांगलादेशच्या कर्णधाराने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. मात्र आयसीसी आता याविरोधात कठोर पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

वर्ल्डकप जिंकताच बांगलादेशी खेळाडूंचे ‘असभ्य’ वर्तन; हिंदुस्थानी खेळाडूंना शिवीगाळ, धक्काबुक्की

आपली प्रतिक्रिया द्या