CWC2019 : अफगाणिस्तानची पाटी कोरीच, बांग्लादेशची सेमिफायनलकडे वाटचाल

सामना ऑनलाईन । साऊथॅम्पटन

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकमध्ये 31 वा सामना बांग्लादेश आणि अफगाणिस्तान संघात साऊथॅम्पटनच्या मैदानात रंगला. बांग्लादेशने विजयासाठी दिलेल्या 263 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 200 धावांवर बाद झाला. बांग्लादेशने 62 धावांनी विजय मिळवत सेमिफायनलकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. या पराभवामुळे अफगाणिस्तानची विजयाची पाटी मात्र पुन्हा एकदा कोरीच राहिली आहे. बांग्लादेशकडून शाकीबने सर्वाधिक 5 बळी घेतले.

त्याआधी नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने बांग्लादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बांग्लादेशने मुशफिकूर रहिमच्या 83 आणि शाकिब अल हसनच्या 51 धावांच्या बळावर 50 षटकात 7 बाद 262 धावा केल्या. मुजीबने 3 बळी घेतले.

वाचा लाईव्ह अपडेट – 

 • अफगाणिस्तानच्या 200 धावा पूर्ण
 • अफगाणिस्तानची पराभवाकडे वाटचाल
 • 60 चेंडूत 97 धावांची आवश्यकता
 • 40 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 6 बाद 165 धावा
 • अफगाणिस्तानच्या 150 धावा पूर्ण
 • अफगाणिस्तानला सहावा धक्का, इक्रम रनआऊट
 • 90 चेंडूत 131 धावांची आवश्यकता
 • 35 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 5 बाद 132 धावा

 • अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत
 • 30 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 4 बाद 111 धावा
 • अफगाणिस्तानला चौथा धक्का, शाकिबचा तिसरा बळी

 • अफगाणिस्तानला तिसरा धक्का, नईब 47 धावांवर बाद
 • अफगाणिस्तानच्या 100 धावा पूर्ण
 • अफगाणिस्तानला दुसरा धक्का
 • 20 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 1 बाद 77 धावा
 • 15 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 1 बाद 58 धावा
 • अफगाणिस्तानच्या 50 धावा पूर्ण
 • अफगाणिस्तानला पहिला धक्का

 • 10 षटकानंतर बिनबाद 48 धावा
 • पाच षटकानंतर बिनबाद 21 धावा
 • अफगाणिस्ताची सावध सुरुवात
 • बांग्लादेशचे अफगाणिस्तासमोर 263 धावांचे आव्हान
 • बांग्लादेशच्या 50 षटकात 7 बाद 262 धावा

 • बांग्लादेशला सहावा धक्का, रहिम बाद
 • 45 षटकानंतर बांग्लादेशच्या 5 बाद 220 धावा
 • महमदुल्लाह 27 धावांवर बाद
 • बांग्लादेशचा अर्धा संघ तंबूत
 • बांग्लादेशच्या 200 धावा पूर्ण
 • रहिमचे अर्धशतक, बांग्लादेशचा डाव सारवला

 • 35 षटकानंतर बांग्लादेशच्या 4 बाद 161 धावा
 • बांग्लादेशला चौथा धक्का
 • बांग्लादेशच्या 150 धावा पूर्ण
 • 30 षटकानंतर बांग्लादेशच्या 3 बाद 143 धावा
 • अर्धशतकानंतर शाकिब बाद

 • शाकिबचे वर्ल्डकपमधील पाचवे अर्धशतक, बांग्लादेश सुस्थितीत
 • 25 षटकानंतर बांग्लादेशच्या 2 बाद 132 धावा
 • शाकिब-अल-हसनचे वर्ल्डकप कारकीर्दीतील 1000 धावा पूर्ण

 • बांग्लादेशच्या 100 धावा पूर्ण
 • 20 षटकानंतर बांग्लादेशच्या 2 बाद 95 धावा
 • बांग्लादेशला दुसरा धक्का, तमिम इक्बाल 36 धावांवर बाद

 • 15 षटकानंतर बांग्लादेशच्या 1 बाद 74 धावा
 • बांग्लादेशच्या 50 धावा पूर्ण
 • दहा षटकानंतर बांग्लादेशच्या 1 बाद 44 धावा
 • पाच षटकानंतर बांग्लादेशच्या 1 बाद 25 धावा
 • बांग्लादेशला पहिला धक्का, दास बाद

 • तीन षटकानंतर बिनबाद 16 धावा
 • बांग्लादेशच्या फलंदाजीला सुरुवात
 • नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने बांग्लादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले

 • थोड्याच वेळात होणार नाणेफेक
 • बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामना