राशिद खानला साहेबांनी कुटले, विश्वविक्रमी धुलाईने कंबरडे मोडले

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

वर्ल्ड क्रिकेटमध्ये आपल्या अफलातून फिरकीने भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या गूल करणारा अफगाणिस्तानचा फिरकीपटून राशिद खान मंगळवारी वर्ल्डकप 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या लढतीत निष्प्रभ ठरला. इंग्लंडच्या फलंदाजांनी राशिदच्या फिरकीवर तुफान हल्ला चढवला. राशिद खानच्या गोलंदाजीवर तब्बल 110 धावांची लूट गोऱ्या साहेबांनी केली. विशेष म्हणजे 50 षटकांच्या या लढतीत राशिद खान आपले 10 षटकंही पूर्ण करू शकला नाही. राशिद खानच्या 9 षटकात 12.22 च्या सरासरीने 110 धावा चोपण्यात आल्या. या धुलाईसह राशिदच्या नावावर एक दिवसीय क्रिकेटमधील नकोसा विक्रम जमा झाला आहे.

एक दिवसीय क्रिकेटमध्ये एका डावा सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज –
1. मिशेल लेविस (ऑस्ट्रेलिया विरुद्घ दक्षिण आफ्रिका, 2006) – 10 षटकात 113 धावा
2. वहाब रियाज (पाकिस्तान विरुद्घ इंग्लंड, 2016) – 10 षटकात 110 धावा
3. राशिद खान (अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, 2019) – 9 षटकात 110 धावा