हिंदुस्थानच्या महिलांचा दणदणीत विजय,श्रीलंकेचा 9 गडी व 181 चेंडू राखून धुव्वा

16

सामना ऑनलाईन, मुंबई

मानसी जोशीसह सर्व गोलंदाजांनी केलेली प्रभावी कामगिरी आणि महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाने केलेल्या नाबाद 73 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने येथे झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात यजमान श्रीलंकेचा 9 गडी व 181 चेंडू राखून धुव्वा उडवला. दोन देशांमधील ही मालिका आयसीसी महिला चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवण्यात येत आहेत.

99 धावांचा पाठलाग करणाऱया हिंदुस्थानच्या महिला संघाने अवघा एक गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. पूनम राऊत व स्मृती मंधाना या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची सणसणीत सलामी दिली. स्मृती मंधानाने 76 चेंडूंत 2 उत्तुंग षटकार व 11 नेत्रदीपक चौकार चोपून काढत नाबाद 73 धावांची शानदार खेळी साकारली. पूनम राऊत 24 धावांवर बाद झाली. याआधी मानसी जोशीने 16 धावा देत 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. झुलन गोस्वामी, पूनम यादव यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केल्यामुळे श्रीलंकेचा डाव 98 धावांमध्येच गडगडला.

आपली प्रतिक्रिया द्या