आऊट नसतानाही विराट आऊट झाला, क्रिकेटच्या मैदानातील विचित्र घटना

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान लढतीदरम्यान एक विचित्र घटना घडली. 48 व्या षटकामध्ये मोहम्मद आमिरचा एक बाऊन्सर विराट कोहलीच्या बॅट जवळून यष्टीरक्षक सरफराज अहमदकडे गेला. गोलंदाजाने अपिल केली, अंपायरने बोट वर केले नाही, परंतु विराट मात्र डीआरएस न घेता पवेलियनकडे चालू लागला. परंतु रिल्पेमध्ये चेंडू विराटच्या बॅटला घासून गेला नसल्याचे स्पष्ट झाले.

#INDvPAK सचिनचा आणखी एक विक्रम विराटने मोडला

‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक

रिप्लेमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये मोठे अंतर असल्याचे दिसून आले. त्यावेळी विराटने डीआरएस का घेतला नाही असा सवाल प्रेक्षकांनी उपस्थित केला. परंतु विराट ड्रेसिंग रुममध्ये गेला तेव्हा त्याने बॅटचे हँडल तपासून पाहिले असता त्याचा आवाज येत असल्याचे जाणवले. विराटप्रमाणे धोनीने देखील त्याची बॅट हातात घेऊन तपासली. मैदानामध्ये चेंडू बॅटला घासून गेला असे विराटला वाटले, परंतु तो बॅटच्या हँडलचा आवाज होता. अशा पद्धतीने विराट आऊट नसतानाही आऊट झाला.

Photo : रोहितचा सचिनला ओव्हरटेक, जलद 24 शतकं ठोकणाऱ्यात चौथा

दरम्यान, बाद होण्यापूर्वी विराटने 65 चेंडूत 77 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने 50 षटकात 5 बाद 336 धावा करत पाकिस्तानपुढे विजयासाठी 336 धावांचे आव्हान ठेवले. परंतु विराट जर अशा विचित्र पद्धतीने बाद झाला नसता तर हेच लक्ष्य कदाचित 350 पेक्षा जास्त असते.

नेटिझन्सने उडवली खिल्ली
आऊट नसतानाही विराट पवेलियनकडे चालता झाल्याने नेटिझन्सने संतापही व्यक्त केला आहे. अनेकांनी ट्वीट करत हा अति चांगुलपणाचा परिणाम असल्याचा टोलाही लगावला, तर काहींनी यावर मीम्सही शेअर केले आहेत.