मंदावलेल्या धोनीचे करायचे तरी काय? संघ व्यवस्थापन पेचात

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी वाढत्या वयामुळे तुफानी खेळी करण्यात सतत अपयशी ठरताना दिसत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने केलेली 52 चेंडूत 28 धावांची कूर्मगती खेळी हिंदुस्थानी संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. त्यामुळे धोनीला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवावे की नाही या पेचात टीम इंडियाचे संघव्यवस्थापन पडले आहे.

… तर वर्ल्डकपमध्ये पुन्हा हिंदुस्थान-पाकिस्तान सामना शक्य

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि उर्वरित प्रशिक्षक वर्ग चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कुणाला पाठवायचे याचाच विचार गंभीरपणे करीत आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत हार्दिक पांड्या अथवा केदार जाधव यांना फलंदाजीत बढती मिळण्याची शक्यता वाढली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर सोशल मीडियावर धोनी ट्रोलही झाला होता. साक्षात क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने देखील संथ फलंदाजीवर आसूड ओढले होते आणि ज्येष्ठ खेळाडूंनी जबाबदारीने खेळण्याचा सल्ला दिला होता.