Video – ‘आता सहन होत नाही’ म्हणत फलंदाज मैदानाबाहेर पळाला, पँट वर खेचतानाचा व्हिडीओ व्हायरल

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने नवख्या संघासाठी पात्रता सामने आयोजित करण्यात आले होते. हे सामने अबुधाबी येथे खेळवण्यात आले होते. एकूण 14 संघ यामध्ये सहभागी झाले होते आणि यातील एक मुकाबला कॅनडा आणि नायजेरिया यांच्यात झाला होता. हा सामना कॅनडाने सहजपणे जिंकला. या संघाने नायजेरियाला 50 धावांनी पराभूत केलं. या सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे सामना काहीवेळ थांबवावा लागला होता. ही घटना अशी होती ज्यामुळे मैदानातील खेळाडू आणि पंचांपासून प्रेक्षकांपर्यंत सगळेजण पोट धरून हसत होते.

… आणि फुटबॉल इतकं प्रसरण पावलं त्याचं गुप्तांग

कॅनडाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना नायजेरियाचा फलंदाज सुलेमान रुन्सेवे हा अचानक मैदानातून पळाला. आठवे षटक सुरू असताना तो अचानक मैदानाबाहेर का गेला याचं अनेकांना आश्चर्य वाटत होतं. कॅनडाचे खेळाडू आणि पंचही तो का पळाला या प्रश्नामुळे हैराण झाले होते. बराचवेळ रुन्सेवे परत येत नाही हे पाहून पुढच्या फलंदाजाने मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली. कर्णधार एडेमोला ओनिकोई हा फलंदाजीसाठी मैदानात येत होता. तेवढ्यात पंचांना रुन्सेवे पुन्हा दिसला, ज्यामुळे त्यांनी कर्णधाराला परत पाठवले.

विचित्र घटना! उंट महिलेवर बसला, सुटकेसाठी उंटाच्या गुप्तांगाला चावा

रुन्सेवे जेव्हा मैदानात आला तेव्हा पंचांनी त्याला अचानक मैदानातून का पळालास याचं कारण विचारलं. यावर तो म्हणाला की मला जोराची ‘शू’ ला लागली होती, अधिक काळ रोखून धरू शकत नसल्याने मैदानातून पळून जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता. मैदानात परत येण्यापूर्वी पँट खाली करून थायपॅड नीट करत असतानाचा रुन्सेवेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एवढी सगळी धावपळ केल्यानंतर आणि रिकामा झाल्यानंतरही रुन्सेवे फार काही कमाल दाखवू शकला नाही. त्याने 27 चेंडूत 27 धावा केल्या. कॅनडाने नायजेरियाच्या संघाला 150 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करणारा नायजेरियाचा संघ 109 धावांत गारद झाला.

आपली प्रतिक्रिया द्या