आता गृहकर्ज स्वस्त होणार; ‘या’ बँकेने केली व्याजदरात कपात

स्वतःचे घर घेणाऱ्यांचे स्वप्न असणाऱ्यांना आता गृहकर्ज स्वस्तात मिळणार आहे. आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केल्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. बँकेने 10 वर्षांच्या नीचांकी स्तरावर व्याजदर आणले आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या आधी एसबीआय, कोटक आणि इतर बँकांनीही त्यांच्या व्याजदरात कपात केल्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

आयसीआयसीआय बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात कपात करत हे दर 6.70 टक्क्यांवर आणले आहेत. हा बँकेचा गेल्या 10 वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे. हे व्यादर 5 मार्चपासून लागू झाले असून 31 मार्चपर्यंत हे दर कायम राहणार आहेत. 75 लाखांपर्यंतचे गृहकर्ज घेणाऱ्यांना या दराचा फायदा होणार आहे. तर 75 लाखांवरील रकमेचे कर्ज घेणाऱ्यांना 6.75 टक्क्यांचा दर निर्धारीत करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात करण्यात आल्याने इतर बँकांकडूनही व्याजदरात कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेकडून रेपोदर 4 टक्के निश्चित करण्यात आला आहे. या दराने इतर बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज मिळते. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात करण्यात आल्याने इतर बँकांना रिझर्व्ह बँकेकडून स्वस्तात कर्ज मिळत आहे. त्यामुळे ते ग्राहकांनाही याचा फायदा देत आहेत.

याआधी एसबीआय,कोटकसह इतर बँकांनीही त्यांच्या व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयने सिबिल स्कोरच्या आधारे 0.1 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. एसबीआयकडून 6.70 टक्के व्यादराने गृहकर्ज देण्यात येत आहे. तर कोटक महिंद्रा बँकेकडून 6.65 टक्क्यांनी गृहकर्ज देण्यात येत आहेत. आता आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात कपात केली आहे. तसेच प्रोसेसिंग शुल्कही माफ केले आहे. हे व्याजर 31 मार्चपर्यंत कायम राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या