पुलवामात लष्कराच्या ताफ्यावर पुन्हा दहशतवादी हल्ला, 9 जवान जखमी

सामन ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे IED स्फोटकं असलेल्या कारमधून पुन्हा एकदा लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 9 जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांनी पुलवामातील अरिहल गावात अरिहल-लस्सीपूरा मार्गावर लष्कराच्या 44 राष्ट्रीय रायफल्सच्या ताफ्याला लक्ष केले आहे. जखमी जवानांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून घटनास्थळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून IED स्फोट घडवून हल्ला होणार असल्याबाबत गुप्तचर यंत्रणांना एक दिवस अगोदरच माहिती मिळाली होती. त्यानुसार परिसरात अॅलर्ट जारी करून सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. IED स्फोटामुळे लष्कराच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, या हल्ल्यातून दहशतवाद्यांचे मनसूबे पूर्ण झाले नसून सर्व जवान सुखरुप असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.  हल्ल्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या