पुलवामामध्ये IED स्फोटकं सापडली, स्वातंत्र्य दिनापूर्वी घातपाताचा डाव उधळला

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात उत्सहाचं वातावरण आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवसांपूर्वी जम्मू आणि कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात घातपाताचा डाव होता. मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावला आहे. सुमारे 30 किलो वजनाचे IED जप्त करून सुरक्षा दलांनी बुधवारी मोठी दुर्घटना टाळली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.