रेशन कार्डावर दुकादार कमी धान्य देत असेल तर या नंबरवर तत्काळ तक्रार करा

गोरगरिबांसाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. कारण रेशन कार्डावर स्वस्त दरात धान्य मिळतं. अनेकदा दुकानदार रेशन कार्ड दाखवल्यानंतर कमी धान्य देत असल्याच्या तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. काही वेळा हे दुकानदार धान्य देण्यास थेट नकारच देतात. हा त्रास सहन करावा लागत असलेल्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने हेल्पलाईन सुरू केलेल्या आहेत. या हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर तुम्ही दुकानदाराविरोधात तक्रार करू शकता.

धान्यवितरणातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि गोरगरिबांपर्यंत धान्य व्यवस्थितरित्या पोहोचते आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. जर कोणत्याही रेशनकार्ड धारकाला त्याला मिळणाऱ्या कोट्यानुसार धान्य मिळत नसेल तर तो या हेल्पलाईनवर फोन करून तक्रार करू शकतो. कोणत्याही राज्यातील हेल्पलाईन नंबर शोधण्यासाठी तुम्ही https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या वेबसाईटला भेट देऊ शकता. तुम्हाला हव्या असलेल्या राज्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हवे असलेले सगळे नंबर तत्काळ मिळतील. रेशन कार्डासाठी अर्ज केल्यानंतर ते मिळवण्यात अडचणी येत असतील तर त्यादेखील दूर करण्यासाठी या हेल्पलाईनवर फोन करू शकतो. वाचकांच्या सोईसाठी सगळ्या राज्यांची नावे आणि हेल्पलाईन नंबर आम्ही या बातमीमध्येच देत आहोत.

  • आंध्रप्रदेश – 1800-425-2977
  • अरुणाचल प्रदेश – 03602244290
  • आसाम – 1800-345-3611
  • बिहार- 1800-3456-194
  • छ्त्तीसगड- 1800-233-3663
  • गोवा- 1800-233-0022
  • गुजरात- 1800-233-5500
  • हरियाणा – 1800-180-2087
  • हिमाचल प्रदेश – 1800-180-8026
  • झारखंड – 1800-345-6598, 1800-212-5512
  • कर्नाटक- 1800-425-9339
  • केरळ- 1800-425-1550
  • मध्य प्रदेश- 181
  • महाराष्ट्र- 1800-22-4950
  • मणिपूर- 1800-345-3821
  • मेघालय- 1800-345-3670
  • मिजोरम- 1860-222-222-789, 1800-345-3891
  • नागालँड- 1800-345-3704, 1800-345-3705
  • ओडीशा – 1800-345-6724 / 6760
  • पंजाब – 1800-3006-1313
  • राजस्थान – 1800-180-6127
  • सिक्किम – 1800-345-3236
  • तमिळनाडू – 1800-425-5901
  • तेलंगाणा – 1800-4250-0333
  • त्रिपुरा- 1800-345-3665
  • उत्तरप्रदेश- 1800-180-0150
  • उत्तराखंड – 1800-180-2000, 1800-180-4188
  • पश्चिम बंगाल – 1800-345-5505
  • दिल्ली – 1800-110-841
  • जम्मू – 1800-180-7106
  • कश्मीर – 1800-180-7011
  • अंदमान आणि निकोबार – 1800-343-3197
  • चंदीगड – 1800-180-2068
  • दादरा और नगर हवेली तसेच दमण आणि दीव – 1800-233-4004
  • लक्षद्वीप – 1800-425-3186
  • पुदुच्चेरी – 1800-425-1082