प्लॅस्टिक बंदी मोडल्यास तीन महिन्याचा कारावास

45

सामना प्रतिनिधी । मुंबई

पर्यावरण मंत्री रामदास कदम गुढीपाडव्याच्या शूभ मुहूर्तावर राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर ही बंदी मोडणाऱ्यांना तीन वर्षांचा कारावास ठोठावण्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. सार्वजनिक कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या थर्माकॉलच्या ताट-वाटे पेले यांच्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २५ हजार रुपये दंडही करण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून याबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी विधानसभेत केले. प्लॅस्टिक बनविल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकॉलच्या वस्तू, प्लास्टिक पाऊस, वेष्ठन असेलेली उत्पादने, त्याची साठवणूक, विक्री करण्यावरही पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे.

तसेच या निर्णयातून काही उत्पादने वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये औषधांच्या वेष्ठनांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, वन व फलोदोत्पनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक वगळण्यात आले आहे. मात्र, याबाबत नवीन नियमावली करण्यात आली असून ठळकपणे या उत्पादनाचा वापर कशासाठी केला जाणार आहे, हे ठळकपणे नमूद करणे सक्तिचे करण्यात आले आहे. तसेच आयात-निर्यात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर औद्योगिक वापर असल्याचे नमूद करावे लागणार आहे.

दुधाच्या पॅकेजिंगसाठी पन्नास मायक्रॉनपेक्षा जाड पिशव्या वापरण्यास परवानगी असून मात्र, या पिशव्यांचा पुनर्रवापरासाठी असलेली नोंद पिशव्यावर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या पिशव्यांचा पुनर्वापराचा खर्च प्रत्येकी पन्नास पैशांपेक्षा कमी खर्च असावा, असे दूध डेअरींना उत्पादकांना सूचित करण्यात आले आहे. तसेच पुनर्रखरेदीही बंधनकारक करण्यात आले आहे.

प्लॅस्टिक पाण्याचा बाटल्याच्या पुनर्रवापरही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या वस्तुंना प्रतिबंधित करण्याऐवजी वस्तू व सेवा कर संचालनलयाकडून उत्पादन स्तरावर प्रत्येक आकारमानानुसार पुनर्रवापर आणि पुनर्रचरक्रन शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच किरकोळ विक्री स्तरावर मनपा, नगरपंचायतीकडून कर वसूली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुनर्रवापराद्वारे मिळणारा जीएसटीचा परतावा पुनर्रवापर करणाऱ्या उत्पादन कंपन्यांना परत देण्याचे तरतूद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या