
राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले आहे. या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही सुळे यांनी केला आहे.
शेतकरी आणि कष्टकरी आपल्या विविध मागण्यांसाठी विधानभवनाच्या दिशेने निघाले आहेत. हे ‘लाल वादळ’ नेमकं कशासाठी आणि काय आहे हे किमान समजून घेण्याची संवेदनशीलता सरकारने दाखविली पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. स्वतः मुख्यमत्र्यांनी पुढाकार घेत, या मोर्चाला सामोरे जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असे मतही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.