इफ्फीचा पडदा आज उघडणार; देश-विदेशातील सिनेमे पाहण्याची संधी

404

सिनेसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या 50व्या ‘इफ्फी’ महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात होणार आहे. 76 देशांमधील 200 सिनेमे पाहण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे. पणजीच्या बांबोलिम येथील शामप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये दुपारी 3 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून 28 नोव्हेंबरपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. उद्घाटन सोहळय़ाला महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत उपस्थित राहणार आहेत. रजनीकांत यांना यंदा स्पेशल आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली जीवनगौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या