IIFA Awards- ‘हा’ ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

689
iifa-awards


IIFA चित्रपट पुरस्कारांची चर्चा नेहमीच रंगते. यंदाही IIFA चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. यंदा आलिया भट आणि विकी कौशल यांच्या दमदार अभिनयाने गाजलेल्या ‘राझी’ या चित्रटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

देशभक्ती आणि हिंदुस्थानची गुप्तचर संघटना ‘रॉ’ वर हा चित्रपट आधारित आहे. आपल्या देशासाठी पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या राजकीय कुटुंबात निकाह करून जाणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत देशाला माहिती पुरवणाऱ्या एका महिला गुप्त हेराची ही कहाणी आहे. आलिया भटने दमदार अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या चित्रपटातील ‘ए वतन वतन मेरे…’ हे गाणं लोकांमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या