सलमानसोबत दिसलेली ही नवी अभिनेत्री कोण? चर्चा तर होणारच!

2042
salman-sai-manjrekar-1

बुधवारी मुंबईत IIFA Awards चा सोहळा दणक्यात पार पडला. या सोहळ्यासाठी बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र असेल तरी सर्वाधिक चर्चा राहिली ती बॉलीवूड अभिनेता सलमान खान सोबत दिसलेल्या नव्या सेलिब्रिटीची. सलमान सोबतचा या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

सलामन खान सोबत दिसलेली ही अभिनेत्री म्हणजे अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर आहे. सई पहिल्यांदाच सलमान खान सोबत या पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचली. दोघांच्या एन्ट्रीमुळे ही अभिनेत्री कोण याची चर्चा रंगली. सईने आपला लुक अगदी साधा ठेवल्याने ती अधिक खुलून दिसत होती.

salman-sai-manjrekar-2

कार्यक्रमात सहभागी होताना दोघांनी रेड कार्पेटवर पत्रकारांसाठी खास पोज दिली. त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

salman-sai-manjrekar-iifa

सलमान खानच्या दबंग 3 मधून सई बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. यामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि खुद्द महेश मांजरेकर देखील दिसणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या