इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Mumbai) ने संस्थेच्या वार्षिक परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हलमध्ये ‘राहोवन’ नावाचे नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1.2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हिंदुस्थानी महाकाव्य ‘रामायण’ वर आधारित, या नाटकाला प्रभू रामाचा अपमानास्पद उल्लेख केल्याबद्दल आणि हिंदू संस्कृतीचा अनादर केल्याबद्दल सोशल मीडियावरून प्रचंड टिकेला सामोरं जावं लागलं आहे.
बड्या इन्स्टिट्यूटमधील एका सेमिस्टरच्या फीच्या जवळपास असलेल्या दंडाव्यतिरिक्त, पदवीधर विद्यार्थ्यांना जिमखाना पुरस्कारांमध्ये कोणतीही मान्यता मिळणार नाही. दरम्यान, त्यांच्या कनिष्ठांना प्रत्येकी 40,000 रुपये दंड आणि वसतिगृहाच्या सुविधांपासून बंदी घालण्यात आली आहे.
31 मार्च रोजी झालेल्या या नाटकात विविध विभाग आणि वर्षातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या नाटकाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले होते, ज्यात सीता आणि लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील संभाषणावर प्रचंड टीका होत असल्याचे दिसून आले आहे.
‘राहोवन’ने मुख्य पात्रांना अत्यंत वाईट रुपात दाखवल्याचा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. हे नाटक हिंदू संस्कृती आणि धार्मिक भावनांची चेष्टा करणारे असल्याचा आरोपही करण्यात आला. यानंतर संस्थेने शिस्तपालन समिती स्थापन केली. नाटकात सहभागी झालेले विद्यार्थीही या बैठकीत सहभागी झाले होते.
बराच विचार केल्यानंतर, समितीने दंड आणि इतर शिस्तभंगाची कारवाई केली.
ज्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला त्यांनी असा दावा केला की हे नाटक आदिवासी समाजावर आधारित एक स्त्रीवादी भूमिका असलेले आहे आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला आहे.
आयआयटी मुंबईने मात्र विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.