आयआयटी मुंबईतील मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना वार्षिक २९ लाखांचे पॅकेज

32

सामना ऑनलाईन । मुंबई

पवई येथील आयआयटी मुंबईतील शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक २९ लाख रुपये वार्षिक वेतनाचे पॅकेज मिळाले आहे. प्लेसमेंटमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला किमान साडेसतरा लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. ५२ नामांकित कंपन्या या प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडूनही मिळाल्या संधी
यंदा या मॅनेजमेंट स्कूलच्या प्लेसमेंटमध्ये नव्या कंपन्याही सहभागी झाल्या होत्या. त्यात डीई शॉ, सॅप, व्हर्लपूल, पिडीलाइट, सिमेन्स, ब्रिटानिया, जेएलएल, गोदरेज ऍन्ड बॉईस, क्रिसिल यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे आयओसीएलसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना कन्सल्टिंग, फायनान्स, ऑपरेशन्स, सेल्स ऍन्ड मार्केटिंगमध्ये संधी दिल्या.

आयटी, बँकिंग कंपन्यांच्याही ऑफर्स
कॉर्पोरेट बँकिंग, बिझनेस ऍनालिसिस ऍण्ड रिसर्च, रिलेशनशिप बँकिंग आदी क्षेत्रांतही विद्यार्थ्यांना गोल्डमॅन सॅच्स, जे. पी. मॉर्गन, डीई शॉ, बीएनपी पॅरीबस, ऑक्सिस बँक, क्रिसिल, आयसीआयसीआय, इंडस व्हॅली पार्टनर, यस बँक आदी कंपन्यांनी विद्यार्थ्यांची निवड केली. ऍसेंचर, कॅपजेमिनी, सिस्को, डिलॉईट अशा आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडूनही विद्यार्थ्यांना ऑफर्स मिळाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या