लातूरमध्ये अतिक्रमण हटाव जोरात

32

सामना प्रतिनिधी । लातूर

शहर महानगर पालिकेच्यावतीने सध्या अतिक्रमण हटाव मोहिम जोरात सुरू करण्यात आलेली आहे. शहरातील गांधी चौकामध्ये आज ही मोहिम राबवण्यात आली. गांधी चौकातील टपऱ्या आणि दुकानासमोरील मोकळया जागेवरील कट्टे काढून टाकण्यात आले. ही मोहिम सुरुच राहणार असल्याचे महानगर पालिकेच्यावतीने जाहिर करण्यात आलेले आहे. शहरातील मिनी मार्केट भागातील अतिक्रमणांवर लवकरच हातोडा पडणार असल्याचे सांगण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळे हटवण्याचे कामही सुरु करण्यात येणार आहे. १२ धार्मिक स्थळांना दिल्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या