मध्यरात्री होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीने मच्छिमार संतप्त

22
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण किनारपट्टीवर प्रकाश झोतातील मासेमारीचा धुमाकुळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री किल्ले सिंधुदुर्ग ते कवडा रॉक परिसरात १समुद्रात शेकाडोच्या संख्येने दाखल झालेल्या बोटीतुन रात्रीच्या वेळी बेकायदेशीररित्या मासेमारी सुरू होती.

दरम्यान, याबाबत मच्छिमार नेते विकी तोरस्कर यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र बोटींनी पळ काढला. पोलिसांनी समुद्रात ५ सागरी मैल क्षेत्र हद्दी पर्यंत पोलिसांची गस्त असते. तर मत्स्य विभागाची गस्तही सुरु असते. मात्र रात्रीच्या वेळी (सायंकाळी ६ ते सकाळी ६) मासेमारी करण्यास बंदी असल्याने मत्स्य विभागाची गस्त बंद असते. त्याचा गैरफायदा घेत रात्रीच्या वेळी आधुनिक तंत्र वापरून मासेमारी केली जात आहे.

प्रकाश झोतातील मासेमारी प्रकाराला गोवा व अन्य राज्यात विरोध आहे. रात्रीच्या वेळी समुद्रात काही बोटीच्या साहाय्याने तीव्र प्रकाश समुद्रात सोडला जातो. त्यामुळे मासे एका जागी थांबतात व अन्य बोटीतुन मासेमारी केली जाते. या मासेमारी प्रकारात मासळीची मोठ्या प्रमाणात लुट होते.

आपली प्रतिक्रिया द्या