लातूर – ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ, पोलिसांचे धाडसत्र

413

लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज उदगीर तालुक्यातल्या कवळखेड आणि डोंगरशेळकी येथे धाड टाकून दडवून ठेवलेले दारू बनविण्याचे रसायन उद्ध्वस्त केले.

अंदाजे दीड लाख रुपये किमतीचे हे रसायन आहे. अवैध दारू विक्रीबाबत स्थानिक लोकांच्या तक्रारी वाढल्याने उत्पादन शुल्क विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसात जवळपास 20 ठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या