कत्तलखान्याकडे जाणाऱ्या ट्रकवर कारवाई

65

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

पंढरपूरमध्ये म्हशींना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा ट्रक तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला आहे. देवगाव टोलनाक्याजवळ मंगळवेढ्याचे तहसीलदार प्रदीप शेलार यांनी सापळा रचून म्हशींनी भरलेला ट्रक पकडला. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ट्रक चालक लालासा हुसेन मकानदार याला अटक केली आहे. चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मंगळवेढा येथून सोलापूरकडे निघालेल्या या ट्रकमध्ये १९ म्हशींना अत्यंत दाटीवाटीत कोंबण्यात आलं होतं. म्हशींनी आरोडाओरडा करू नये म्हणून म्हशींची तोंडं दोरीन घट्ट बांधण्यात आली होती. त्यामुळे पुरेशा प्रमाणात प्राणवायू न मिळाल्यानं म्हशींची स्थिती अत्यंत वाईट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या